Loksabha 2019: शरद पवारांच्या स्टेजवर अर्धनग्न शेतकरी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

- अर्धनग्न अवस्थेतील कृष्णा डोंगरे नावाचा शेतकरी स्टेजवर
- शेतमालाला भाव मिळत नाही, तोपर्यंत शर्ट न परिधान करण्याचा संकल्प
- शरद पवार यांची स्टेजवरच भेट घेत निवेदन केले सादर
- डोंगरे अर्धनग्न अवस्थेत फिरतांना दिसताच पवारांनी  व्यासपीठावर बोलवून घेत केली चर्चा

निफाड (नाशिक): दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ निफाड जिल्हा नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती.

अर्धनग्न अवस्थेतील कृष्णा डोंगरे नावाचा शेतकरी स्टेजवर आला. शेतीला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत शर्ट न परिधान करण्याचा संकल्प करणाऱ्या नगरसूल (ता. येवला) येथील या शेतकऱ्याने आज अर्धनग्न अवस्थेत शरद पवार यांची निफाड येथे स्टेजवरच भेट घेत निवेदन सादर केले. व्यासपीठाच्या परिसरात डोंगरे अर्धनग्न अवस्थेत फिरतांना दिसताच पवार यांनी त्यांना व्यासपीठावर बोलवून घेत चर्चा केली.

डोंगरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घाबरू नये, आपल्या मागण्या लवकरच मान्य होणार असून 26 मेनंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देईल, असे आश्वासन दिले. या सभेत अर्धनग्न डोंगरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.
 

नरेंद्र मोदी सभा घेण्यापूर्वी तेथील शेतकऱ्यांना अटक करतात आणि मगच त्या ठिकाणी पाऊल ठेवतात, शेतकऱ्यांना इतके घाबरणारा पंतप्रधान देश प्रथमच पाहतोय. आमच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने पवार साहेबांसमोर आपली कैफियत मांडली. या भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय जनता शांत बसणार नसल्याचेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी ट्विट करून सांगितले आहे.

Web Title: in a shocking incident during Sharad Pawar rally at nifad half naked farmer protested on stage