श्री नागेश्वर महादेवाचे प्राचीन क्षेत्र असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर माजी शालेय शिक्षण, क्रीडामंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी संस्थानची स्थापना करुन या परिसराचा कायापालट केला आहे. आजमितीस भाविकांसाठी संपूर्ण सुखसुविधा असलेले देवस्थान म्हणून नागेश्वरची ख्याती आहे. व्यापक प्रमाणात डोंगरावर वृक्षारोपण केल्यामुळे स्थानमहात्म्यासह पर्यटन स्थळ म्हणूनदेखील त्याची प्रसिद्धी आहे. श्रावण महिन्यात तेथे मोठा यात्रौत्सव भरतो. यासह तेथील विविध मंदिरामध्ये वर्षभरात विविध उत्सव, सत्संगादी कार्यक्रम नियमित होतात. शिरपूर- महाशिवरात्रीनिमित्त अजनाड बंगला (ता. शिरपूर) येथील नागेश्वर महादेव येथे बुधवारी (ता. २६) श्री क्षेत्र नागेश्वर संस्थानतर्फे १००८ श्री पार्थिव शिवपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.