शहादा- महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तलावाचा गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन करणे, नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या माध्यमातून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट ताकदीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार जिल्हा जलप्रकल्पप्रमुख डॉ. कांतिलाल टाटिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.