Latest Dhule News | आता शेतकऱ्यांमध्ये टोकणयंत्राचा बोलबाला..!; सामान्य शेतकऱ्यांचे यंत्रास प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Patil while sowing wheat with tiller

Dhule News: आता शेतकऱ्यांमध्ये टोकणयंत्राचा बोलबाला..!; सामान्य शेतकऱ्यांचे यंत्रास प्राधान्य

कापडणे (जि. धुळे) : परिसरात विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी अधिक असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग आला आहे. शेतकरी टोकणयंत्राने पेरण्या करीत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी लातूर येथून टोकणयंत्र विकत घेतले आहे. या यंत्राने गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, मका आणि कडधान्याचीही पेरणी करता येते. बहुउपयोगी असल्याने सधनसह सामान्य शेतकऱ्यांनी टोकणयंत्र विकत घेण्यास प्राधान्य दिले आहे. (small farmers using token machine Nashik News)

हेही वाचा: Nashik News : जिल्हातंर्गत शिक्षक पडताळणीमध्ये 13 शिक्षक अपात्र; हरकतींसाठी 3 पर्यंत मुदत

शेतकऱ्यांमध्ये या यंत्राचा मोठा बोलबाला सुरू आहे.धुळे तालुक्यातील शिंदखेडा तालुका वगळल्यास धुळे, शिरपूर आणि साक्री तालुक्यात रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी आहे. लवकरच धरण आणि प्रकल्पांचे पाणीही रब्बी हंगामासाठी मिळणार आहे. विहिरी आणि कूपनलिकांना समाधानकारक पाणी असल्याने रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी नऊ ते अकरा हजारांपर्यंत मिळणाऱ्या टोकणयंत्राची खरेदी केले आहे. यावर शासकीय अनुदानही मिळत आहे.

एकरी तीनशे रुपये भाडे

टोकणयंत्र पेरणीसाठी भाड्यानेही उपलब्ध करून दिले जात असून, एकरी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. बदलते सेटिंग असल्याने पाहिजे त्या योग्य अंतरावर पेरणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यां‍मधून समाधान व्यक्त होत आहे.

"ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्याच्या तुलनेत टोकणयंत्र परवडणारे आहे. बहुउपयोगी आहे. पेरणी केलेले बी शंभर टक्के उबवते. अधिकतर शेतकऱ्यांनी हे यंत्र घेतले पाहिजे."

-सुदाम पाटील व आबा पाटील, युवा शेतकरी, कापडणे

हेही वाचा: Nashik News : वैद्यकीय, अग्निशमनाच्या रिक्तपदांसाठी NMCकडून प्रस्ताव

टॅग्स :DhuleFarmeragriculture