
चिनीच्या युध्दात चिन्यांनी हिंदी चिनी भाई भाई असे म्हणून कसे फसविले. अन त्यांना तोडीस तोड उत्तर कसे उत्तर दिले.
निमगुळ/कापडणे : निमगुळ ता.शिंदखेडा येथील निवृृृत्त सैनिक भास्करराव मल्हारराव बागल (वय 83) यांचे आज (ता.15) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी पाचला अंत्यसंस्कार करण्यात आले. बागल हे सैन्य दलातील मराठा बटालियनमध्ये असतांना त्यांनी चीन, पाकिस्तान, बांगलादेश मुक्ती युध्दात सहभाग त्यांचा होता.
आवर्जून वाचा- दुर्मिळ आजार बालिकेला जडला; डॅाक्टरांनी असे केले, की 'ती' स्वतःच्या पायावर घरी चालत गेली !
भास्करराव बागल हे मराठा बटालियनमध्ये असतांना इनफ्रन्र्टीमध्ये होते. 1962 च्या चीन व 65 च्या पाक युध्दात ते लढले होते. चीन युध्दात बाॅम्ब चा काही अंश तुकडा हातावर पडल्याने जखमी झाले होते. पाक युध्दातही जखमी झाले होते. बांग्लादेश मुक्ती युध्दातही सहभाग होता. दोंडाईचा येथील शिवनेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक पंढरीनाथ बागल व कापडणे येथील जिल्हा परीषदेच्या शिक्षिका किरण पाटील यांचे वडिल तर माध्यमिक शिक्षक पी.बी. पाटील यांचे सासरे होत.
युद्धाची माहिती देतांना अंगावर शहारे
चिनीच्या युध्दात चिन्यांनी हिंदी चिनी भाई भाई असे म्हणून कसे फसविले. अन त्यांना तोडीस तोड उत्तर कसे उत्तर दिले. हे जेव्हा भास्करराव बागल सांगायचेत तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारे येत असे. बागल यांनी बाॅम्बचा तुकडा आणि गोळीचा काही भाग आजही बागल कुटुंबियांकडे संग्रहीत आहे.
आवर्जून वाचा- व्हाट्सएपने जोडले अठराशे विवाह; सोशल मिडीया ठरतेय मध्यस्थी
सैनिक दिनी मृत्यू
भास्करराव बागल यांनी चीन, पाकिस्तान, बांगलादेश मुक्ती अशा युध्दात सहभाग घेवून ते जखमी झाले होते. अशा योध्दाचा आज सैनिक दिनीच मृत्यू झाला. जिल्हाभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे