दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला  

भूषण श्रीखंडे
Wednesday, 30 December 2020

गावातील मित्र परिवार तसेच गायकवाड कुटुंबाकडून जवान दिपक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयारीत मग्न होते. परंतु एक फोन आला.

नंदुरबार  :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील  मोग्राणी गावातील जवान गडचिरोली येथे सेवा बजावत असताना हदविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. मात्र घटना घडण्यापूर्वी शहिद जवान दीपक लक्ष्मण गायकवाड व मोग्राणी गाव शहीद जवान यांच्या आज असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या तयारीत असतांना एक फोन आला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या एवजी गावावर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली.

संबधीत बातमी- गडचिरोलीत सेवा बजाविणार्‍या नंदूरबारच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

नवापूर तालुक्यातील मोग्राणी येथील दिपक लक्ष्मण गायकवाड (32) हा एसआरपीएफ मध्ये सन 2014 साली भरती झाले होते. मंगळवारी गडचिरोली येथे सेवा बजावत असतांना दिपक लक्ष्मण गायकवाड याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. दिपक गायकवाड याचा मृत्यू झाल्याची वार्ता सायंकाळी 10 वाजता येताच परिवारासह गावावर शोककळा पसरली. 

आज होता वाढदिवस
शहीद  जवान दिपक गायकवाड यांचा आज वाढदिवस होता. गावातील मित्र परिवार तसेच गायकवाड कुटुंबाकडून जवान दिपक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयारीत मग्न होते. परंतु एक फोन आला आणि गायकवाड कुटूंबासह मोग्राणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या एवजी गावकऱ्यांना जवानाची श्रद्धांजली वाहण्याची तयारी करण्याची वेळ आली. याबाबत मोग्राणी ग्रामस्थामधून हळहळ व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार
वाढदिवसाच्या एक दिवस आगोदर जवान दिपक गायकवाड यांच्यावर काळाने आघात घेला. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर वाढदिवसाची तयारी करण्या एवजी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. 

आवश्य वाचा- रेल्वेचे तिकीट चेक करण्यासाठी मागितले; चक्क! टिसीला डांबून प्रवाश्यांकडून मारहाण

 

गडचिरोली कार्यालयातून आला फोन 
काल सकाळी साडेदहा वाजता गडचिरोली येथील कार्यालयातून परिवाराला दुःखद बातमी झाली असल्याचा फोन आला होता. जवान दीपक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले. दीपक यांचा विवाह १२ मे 2018 रोजी झाला होता. त्यांना मुलं नव्हती. जवान दीपक यांचे आई-वडील पत्नी व दोन लहान भावंडे आहेत. दिपक घरातील जेष्ठ मुलगा होता. त्याच्यानंतर एक भाऊ व एक बहीण आहे. आई वडील यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soldier martyrs marathi news birthday wishes tribute death villagers