Dhule News : नकाणेत सैनिकाला मारहाण; न्यायासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे आंदोलन

crime news
crime newsesakal
Updated on

धुळे : माजी सैनिकाच्या पत्नीस घेण्यासाठी आलेल्या तिघांना नकाणे (ता. धुळे) येथे धमकावून मारहाण करण्यात आली. मारहाण करताना सेवारत सैनिक शरद काकुळीत यांच्यावर लोखंडी रोडने हल्ला करण्यात आला.

त्याचवेळी सैनिक काकुळीत यांची सोन्याची चैन आणि खिश्यातील दीड हजार रूपये ओरबाडून घेण्यात आले. वाहनावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले, अशी तक्रार पोलिसांकडे झाली. (Soldier was beaten in Nakane Movement of Tridal Sainik Seva Sangh for Justice dhule news)

crime news
Nashik News : Hybrid Annuity रस्त्याचे काम थंडावले; कौळाणे- नांदगाव- येवला मार्गावरून खडतर प्रवास!

या गंभीर प्रकारबाबत तक्रार केल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिसांनी हल्लेखोरांबाबत सहानुभुती दाखविली आहे. त्याचा निषेध करतो, असे म्हणत त्रिदल सैनिक सेवा संघातर्फे येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी सांगितले, नावरी (ता. धुळे) येथील माजी सैनिक अतुल शिरसाट यांचे वडील नामदेव शिरसाट आणि सैन्यदलात कार्यरत असलेले शरद काळुळीत हे नकाणे येथे अतुल शिरसाट यांच्या पत्नीस घेण्यासाठी गेले होते.

परंतु, शिरसाट यांच्या पत्नीने नकार दिला. नंतर शिरसाट यांचे सासरे गोरख पाटील यांच्या घरातून बाहेर पडताना प्रमोद पाटील, नानाजी पाटील, मनोज पाटील, विकी पाटील, गुलाब पाटील यांच्यासह अन्य तीन ते चार जणांनी वाहन अडविले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

crime news
Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश

वाहनावर दगडफेक करून चाकूचा धाक दाखविला. धमकावत मारहाण करताना सैनिक शरद काकुळीत यांच्या गळयातील ५० हजार किमतीची सोन्याची चैन आणि एक हजार ७०० रूपये ओरबाडून घेण्यात आले.

नानाजी पाटील याने सैनिक शरद काकुळीत यांच्या हातावर चाकूने वार केला. तसेच प्रमोद पाटील याने अतुल शिरसाट यांच्यावर लोखंडी रोडने वार केला. त्यांच्याकडील अडीच हजार रूपयांची लुट केली.

या गंभीर प्रकाराबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याकडे तक्रार करण्यात आली. या प्रकरणी विविध मागण्यांसाठी त्रिदल सैनिक सेवा संघातर्फे जेल रोडवर धरणे आंदोलन करण्यात आले. संबंधितांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र यादव, अतुन शिरसाट, प्रमोद पाटील, नानाजी पाटील आदी आंदोलकांनी केली.

crime news
Jalgaon News : प्रवासी बोगीच्या Battery boxला आग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com