तळोदा- चिमण्यांच्या संवर्धनाची चळवळ संपूर्ण समाजापर्यंत पोहोचली पाहिजे तरच चिमण्यांचे अस्तित्व टिकेल. आपल्या परिसरात मुबलक पाणी आहे. पण, अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तो टाळला पाहिजे. आपल्या जीवनात पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी केले.