Dhule NCP News: शिरपूर राष्ट्रवादीतही उभी फूट..! दोन गटांवर शिक्कामोर्तब

Ajit Pawar News : रविवारी (ता. ९) ज्येष्ठ नेते दिनेश मोरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्वाळा दिला.
Youth Rural District President Dr. Manoj Mahajan, Taluka President Yuvraj Patil, Ramesh Karankal
Youth Rural District President Dr. Manoj Mahajan, Taluka President Yuvraj Patil, Ramesh Karankalesakal
Updated on

Dhule NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडाळीनंतर ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत असलेल्या येथील पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांतच आपापला पवित्रा स्पष्ट केला. ७ जुलैला युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी बैठक घेऊन संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, रविवारी (ता. ९) ज्येष्ठ नेते दिनेश मोरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्वाळा दिला. (split in Shirpur NCP Sealing two groups ajit pawar Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Summary

शरद पवार गटाचा निर्धार

पवारसमर्थक गटाची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. माजी तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी काळात विश्वासात घेतले जाणार असून, पक्ष संघटन मजबूत करण्यात येणार आहे.

खासदार शरद पवार यांच्या आगामी धुळे जिल्हा दौऱ्यात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग नोंदविण्याचा संकल्प सोडण्यात आला. युवक तालुकाध्यक्ष युवराज पाटील, मोहिद्याचे सरपंच दत्तू पाडवी, प्रल्हाद पाटील, हेमराज राजपूत, बाळकृष्ण पाटील, ब्रिजलाल मोरे, पनाखेडचे उपसरपंच वनसिंह पावरा,

अल्पसंख्याक सेलचे अशफाक सय्यद, बाळासाहेब गुजर, राष्ट्रवादी कामगार संघटनेचे शिवाजीराव बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभय करंकाळ, गौरव पाटील, अरुण मौरे, गणेश देवरे आदी उपस्थित होते.

Youth Rural District President Dr. Manoj Mahajan, Taluka President Yuvraj Patil, Ramesh Karankal
Ajit Pawar Mother: अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, 'अजित..'

अजित पवारांसोबत राहणार : दरम्यान, रविवारी आमोदे येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांची बैठक घेण्यात आली. माजी तालुकाध्यक्ष आशिष अहिरे म्हणाले, की शरद पवार आपले दैवत व पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत.

परंतु विकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा चेहरा म्हणून अजित पवार असून, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते दिनेश मोरे यांनी जनसामान्यांसाठी काम करण्याची क्षमता केवळ अजित पवारांमध्येच असल्याचे सांगितले.

अल्पसंख्याक सेलचे माजी तालुकाध्यक्ष वाजिद शेख यांनी तालुक्यातील व शहरातील अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या समर्थनात असल्याचे सांगितले. विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भूपेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

उपस्थितांनी हात उंचावून अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला. अर्जुन पाटील, निंबा पाटील, बाळकृष्ण पाटील, संजय पवार नीलेश गरुड, पीतांबर पाटील, श्यामकांत मोरे, गौतम थोरात, राजेंद्र मोरे, देवीदास कोळी, हंसराज मोरे, हिरा कोळी,

अ‍ॅड. समाधान भवरे, जाकिर शेख, शोएब पिंजारी, कलंदर खाटीक, आसिफ कुरेशी, मुस्तकीम शेख, सुलतान शेख, वाजिद मिर्झा, आकाश पावरा, विश्वास पावरा, जयेश पाटील, राज माळी, इमरान शेख, रिजवान मिर्झा, उस्मान कुरेशी, स्वप्नील सनेर, अक्षय सनेर, दिनेश देवरे, दुर्गेश पटेल, भावेश शिरसाट आदी उपस्थित होते.

Youth Rural District President Dr. Manoj Mahajan, Taluka President Yuvraj Patil, Ramesh Karankal
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: पक्षफुटीला मला का जबाबदार धरताहेत? छगन भुजबळ यांचा पवारांना प्रश्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.