जळगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील ३१० एसटी बस गणेशोत्सवासाठी शनिवारी (ता. २३) मुंबई, ठाणे मार्गे कोकणात गेल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी (ता.२८) २१० बस जळगावात परतल्या असून, गेल्या सहा दिवसांत तब्बल ३ हजार ७२० फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बसस्थानकांवर दोन ते तीन तास बसची वाट पाहावी लागत होती. तसेच यामुळे जळगाव येथून पुणे, मुंबई, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर या लांब पल्ल्याच्या मार्गावरील तसेच जिल्हा अंतर्गत फेऱ्या कमी झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना चांगलेच हाल सहन यामुळे करावे लागले.