
Dhule News : येथील विरदेल रस्त्यालगतच्या शेतात झालेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत राज्यातील ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शिंदखेडा येथे पन्नास वर्षांनंतर प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत झाली.
तीत तालुक्यातील गोराणे येथील गणेश पाटील यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. (state level bullock cart race was held for first time after 50 years at Shindkheda dhule news)
बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, डॉ. रवींद्र देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.
शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर १९७३ ला केशव मराठे, शेखर पाटील, बी. के. देसले ग्रुपने शर्यत घेतली होती. त्यात सुरेश भामरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते.
धुळे, साक्री जैताणे, चाळीसगाव, शिंदखेडा येथील बैलगाडींचा समावेश होता. सुरवातीला चिठ्ठी टाकून सहा फेरीत प्रथम एक विजेता असे सहा स्पर्धकांची अंतिम शर्यत घेण्यात आली.
शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, द्वितीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप बेडसे तर तृतीय क्रमांक आयोजकांकडून तसेच, चौथे पारितोषिक शिवसेना जिल्हा उपसंघटक भाईदास पाटील, पाचवे पारितोषिक आत्माराम प्रधान यांच्याकडून प्रदान करण्यात आले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश देसले, सुरेश भामरे, प्रकाश पाटील, नाना माळी, अशोक परदेशी, गणेश खलाणे, कैलास पाटील, दत्तात्रय देसले, गजानन भामरे, यादव मराठे, कैलास वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पीक संरक्षण सोसायटीचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष श्यामकांत देसले, दिलीप पाटील, भूषण देसले, बापू चौधरी, तुकाराम चौधरी, संजय बडगुजर, मनोहर भामरे (सचिव), रावसाहेब देसले, श्रावण मराठे यांनी प्रयत्न केले. नाना चौधरी, संतोष देसले, विक्की पाटील, शुभम भामरे, मयूर भामरे यांनी संयोजन केले.
द्वितीय पारितोषिक विभागले
या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गणेश पाटील (गोराणे ता. शिंदखेडा), द्वितीय (विभागून)- विजय माळी, जगदीश मराठे (शिंदखेडा) यांनी पटकाविले. तृतीय- संयुक्तपणे नाना चौधरी (शिंदखेडा), राजपाल पाटील (शिंदखेडा), नाना माळी (शिंदखेडा) तर उत्तेजनार्थ गोपाल पाटील (हातनूर) यांनी पटकाविले.
गोराणेत मिरवणूक, जल्लोष
शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील गणेश पाटील या मालकाच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल गावातून मिरवणूक व जल्लोष करण्यात आला. सुहास कदम, पंकज कदम, पवन पाटील, कृष्णा पाटील, संजय साळुंखे, दुर्गेश पाटील, गुणवंत कदम, तान्हू फरकाटे, जगदीश साळुंखे, राहुल पाटील, ओम पाटील, भूपेंद्र पाटील, जितेंद्र कदम, शेखर पवार, सागर पवार, भागरकर पवार, बापू पाटील, बाळू फरकाटे आदींनी सहभाग घेत गावात जल्लोष केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.