साठवलेला 'लाखांचा' कांदा चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नाशिक : कळवण येथील रहिवाशी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून १लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरटयांनी लंपास केला. याबाबत शेतकरी राहुल पगार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक : कळवण येथील रहिवाशी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून १लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरटयांनी लंपास केला. याबाबत शेतकरी राहुल पगार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

भाव वाढल्याने कांदा चाळीकडे चोरट्यांची वक्रदृष्टी  

पावसाळ्याच्या सुरवातीला दिड महिना पावसाने दडी मारल्याने व कोल्हापूर, सांगली, सातारा भागात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थितीमुळे पावसाळी लाल कांदयाचे पीक काही ठिकाणी वाया गेले. तर काही ठिकाणी उशिराने आलेल्या पावसामुळे लांबणीवर गेले आहे. त्यामुळे साठवलेल्या उन्हाळी (गावठी ) कांद्याचे भाव वाढले आहेत. एक ट्रॉली कांद्याची एक लाखापेक्षा जास्त रकमेची पावती होत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा चाळीकडे चोरट्यांची  वक्रदृष्टी पडली आहे.

कळवण  येथील शेतकरी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारात गट नं ४०३ शेती आहे. या शेतातील चाळीत २२ किलो वजनाचे ११७ प्लास्टिक कॅरेट मध्ये २५ क्विंटल  ७४ किलो वजनाचे कांदे होते. सद्याच्या दरानुसार म्हणजे ३५०० रुपये प्रमाणे १ लाख १ हजार ७९० किमतीचा कांदा चोरीला गेल्याची माहिती मिळाली.

कांद्याचा कुठेच पत्ता नाही

राहुल पगार व त्यांच्या भावाने कळवण, देवळा, उमराणे, चांदवड, लासलगाव, निफाड, पिंपळगाव, वणी, अभोणा, कनाशी, बिल्लीमोरा सुरत (गुजरात ) अशा सर्व बाजारसमितीत शोध घेतला आहे. याबाबत काहीच तपास न लागल्याने काल दि २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिराने अज्ञात चोरट्यांविरोधात  कलम ४६१, ३८०  नुसार कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार पी एन घोडे अधिक तपास करीत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stored of onion was stolen in kalwan