नाहीतर निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकू...

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

 औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील द्याने फाट्याजवळ कांदा उत्पादक शेतक-यांनी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरून तब्बल अर्धा तास आंदोलन छेडले. केंद्र शासनाने व वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात संपुर्ण बंद केली तसेच व्यापारी साठ्यांवरही निर्बंध लावले. किरकोळ व्यापा-यांना शंभर क्विंटल व घाऊक व्यापा-यांना पाचशे क्विंटल अशी कमाल मर्यादा घालण्यात आल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे

नाशिक : औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील द्याने फाट्याजवळ कांदा उत्पादक शेतक-यांनी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरून तब्बल अर्धा तास आंदोलन छेडले. केंद्र शासनाने व वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात संपूर्ण बंद केली तसेच व्यापारी साठ्यांवरही निर्बंध लावले किरकोळ व्यापा-यांना शंभर क्विंटल व घाऊक व्यापा-यांना पाचशे क्विंटल अशी कमाल मर्यादा घालण्यात आल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे.

निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकू  - आंदोलक शेतकरी

कांदाप्रश्नी त्वरीत तोडगा काढला नाही तर  केंद्र व राज्य सरकारच्या कुठल्याही पाहणी करणा-या अधिका-यांना व लोकप्रतिनिधींना परिसरात फिरू दिले जाणार नाही. तसेच  येणा-या विधानसभा निवडणुकावर सामुहिक बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी पत्रकाव्दारे दिला आहे. आंदोलक शेतक-यांनी मंडलाधिकारी खरे व उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांना निवेदन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strike of onion farmers in ambasan