जळगाव- शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येसाठी महत्त्वाचा आणि प्रत्येकाला गरज पडेल तेव्हा धाव घ्यावा लागणारा विभाग म्हणजे जन्म - मृत्यू नोंदणी विभाग होय. मात्र, महापालिकेचा हाच विभाग अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कायम कर्मचारी नसणे, नागरिकांच्या सततच्या तक्रारी, वादविवाद, भांडणे, अधिकाऱ्यांची मनमानी, अशा एक ना अनेक समस्या येथे उद्भवत आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.