Raver News : तीन तास आधी घरातून निघावं लागतंय! विद्यार्थिनींचं बस रोको आंदोलन
Students Stage Protest at Raver Bus Stand : शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींनी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नाही, यासाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाचला सुमारे अर्धा तास बसस्थानकावर बस रोको आंदोलन केले.
रावेर- तालुक्यातील कुसुंबा आणि पातोंडी येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींनी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नाही, यासाठी मंगळवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचला सुमारे अर्धा तास बसस्थानकावर बस रोको आंदोलन केले.