कजगाव (ता.भडगाव)- तांदुळवाडी (ता.भडगाव) येथील शाळा सुटल्यानंतर आपल्या गावी भोरटेक येथील घराकडे सायकलने येणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याला भरधाव बसने मागून जोरदार धडक दिली. त्यात बसचे चाक विद्यार्थ्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही भीषण घटना मंगळवारी (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास भोरटेक गावाजवळ घडली.