बीड- सुसंस्कृत असलेल्या बीड जिल्ह्याची चार-पाच लोकांच्या वागण्यामुळे बदनामी झाली. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आहे. त्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदर पसरू, माणुसकीच्या नात्याने हा लढा लढू,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना सांगितले.