कसं काय पाटील बर हाय का...

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

तलाठी कार्यालय दैनदिन कामकाज करत असतांना पाटील दिपक ठाकरे हे तलाठी कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या भावासाठी उत्पन्नाचा दाखला मागितला. त्यावर तलाठी यांनी भाऊ काय करतात असे विचारले. तेव्हा त्याचे भाऊ घोटी येथे शिक्षक असल्याचे सांगतले.
 त्यावर तलाठी यांनी मला त्यांचा १६ नंबरचा फॉर्म भरुन हवा आहे. यावर दिपक ठाकरे मी गावाचा पाटील आहे. तुला समजत नाही का असे म्हणून तु मला उत्पन्नाचा दाखल दे असे म्हणू लागला. यावर तलाठी यांनी मी देऊ शकत नाही. मला सरकारी नियमात राहून काम करावे लागते.

नाशिक : कसं काय पाटील बर हाय का....आता जे एंकलं ते खरं...हाय का..अशीच चर्चा सध्या चांदवड तालुक्यात सुरु आहे. कारणही तसेच आहे. चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील पोलीस पाटील दिपक ठाकरे यांनी गावात तलाठी कार्यालयात काम करणा-या तलाठी मिलींद गुरुबा यांस बेदम मारहाण केली. पोलीस पाटील दिपक ठाकरे याने पदाचा दबाव वापरुन भावाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न कमी न लावल्यामुळे बेदम मारहाण केली अशी फिर्याद तलाठी गुरुबा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस पाटील ठाकरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मिलीद गुरुबा सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

उत्पन्न कमी न लावल्यामुळे मारहाण 
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मिलींद गुरुबा हे काजीसांगवी येथील तलाठी कार्यालय दैनदिन कामकाज करत असतांना पाटील दिपक ठाकरे हे तलाठी कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या भावासाठी उत्पन्नाचा दाखला मागितला. त्यावर तलाठी यांनी भाऊ काय करतात असे विचारले. तेव्हा त्याचे भाऊ घोटी येथे शिक्षक असल्याचे सांगतले.
 त्यावर तलाठी यांनी मला त्यांचा १६ नंबरचा फॉर्म भरुन हवा आहे. यावर दिपक ठाकरे मी गावाचा पाटील आहे. तुला समजत नाही का असे म्हणून तु मला उत्पन्नाचा दाखल दे असे म्हणू लागला. यावर तलाठी यांनी मी देऊ शकत नाही. मला सरकारी नियमात राहून काम करावे लागते. असे सांगितले. यावर दिपक ठाकरे यांनी चिडून तलाठी गुरुबा यांचा हात पिळून त्यांच्या पोटावर जबर मारहाण केली. पाटील ठाकरे एवढ्यावर थांबले नाही तर तुला मी येथून काढून तर देईल परंतु गुरबा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर तलाठी मिलींद गुरुबा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांकडून अद्याप गुन्हा दाखल नाही

दिपक ठाकरे हे व्यक्तीगत उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले होते. त्याचे कोणतेही सरकारी काम नसल्याने त्यांनी मना प्रमाणे उत्पन्नाचा दाखला दिला नाही म्हणून मारहाण केल्याने त्यांच्यावर सराकरी कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. मात्र अजून पोलीसांनी तसा गुन्हा दाखल केला नाही.  याप्रकरणी मी पुढील चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी व  पोलीस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचे तलाठी मिलींद गुरुबा यांनी सांगितले. 

तलाठी संघटनेने घेतली पोलीस उपअधिक्षकाची भेट  
चांदवड पोलीस ठाण्यात आलेल्या पोलीस उपअधिक्षकांची संघटनेने भेट घेवून सरकारी कर्मचा-यावर गावातील पाटलाने मारहाण केली असून यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही त्वरीत संबंधीत पाटलावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपअधीक्षक साळवे यांनी दिले. 

उपजिल्हाधिकारी करणार कारवाई 
पोलीस पाटील यांच्यावर आम्ही त्वरीत कारवाई करणार असून यात दोषी आढळ्यास पोलीस पाटील पद रद्द करण्यात येईल. तसेच तलाठी मारहाण प्रकरणी पाटलावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना त्वरीत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल. आम्ही या प्रकऱणात कसूर करणार नाही. सरकारी कर्मचा-यावर मारहाण करणे व कामात अडथळा निर्माण करणे हे पोलीस पाटील पदासाठी घातक आहे. त्यामुळे लवकरच आम्ही कठोर कारवाई करु - उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talathi was beaten by police in ganur