अनाथ २७ मुलींचे शिक्षकांनी घेतले पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

शिरपूर ः आई- वडील नसल्याचा परिणाम शिक्षणावर होऊ नये म्हणून विद्यालयात शिकणाऱ्या 27 अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलण्याची जबाबदारी वरूळ (ता. शिरपूर) येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारली. विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिरपूर ः आई- वडील नसल्याचा परिणाम शिक्षणावर होऊ नये म्हणून विद्यालयात शिकणाऱ्या 27 अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलण्याची जबाबदारी वरूळ (ता. शिरपूर) येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारली. विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

वरूळ येथील पटेल विद्यालयाचा आनंद मेळावा नुकताच झाला. यावेळी उपस्थित पालकांशी संवाद साधताना मुख्याध्यापक पी. आर. साळुंखे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. विद्यालयात आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या 27 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणात आजवर कोणताही व्यत्यय येऊ दिलेला नाही. यापुढेही त्यांची शैक्षणिक वाटचाल कायम राहावी, या हेतूने सर्व कर्मचारी हा उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा यांनी विद्यालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांचा पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश

शिरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव कोळी, बाजार समितीचे उपसभापती ईशेंद्र कोळी, शिक्षण विस्ताराधिकारी पी. झेड. रणदिवे, केंद्रप्रमुख एम. एस. सूर्यवंशी, वरूळचे उपसरपंच नरेंद्र मराठे, नवे लोंढरेचे सरपंच डॉ. प्रदीप पाटील, जुने भामपूरचे सरपंच बाळासाहेब पाटील, सुनील पाकळे, धर्मेंद्र ईशी, पंकज मराठे, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे, किशोर माळी, राजेंद्र जाधव, तालुका क्रीडाशिक्षक संघटनेचे सचिव रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.

सत्ताधारी भाजपानेत्यांकडून सभापति नावाबाबत 'सस्पेंस'

राकेश रघुवंशी यांनी सूत्रसंचालन केले. डी. ए. जाधव, आर. ए. माळी, एम. आर. पाटकर, सुनील पाटील, बी. जी. पिंजारी, ए. बी. महाजन, एन. एस. ढिवरे, डी. एन. माळी, मनोज पाटील, पी. टी. पवार, राजेश सोनवणे, पारस जैन, बापू भिल व विद्यार्थिनींनी संयोजन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Take Responsibility of 27 Orphan Girls in Shirpur