दुर्बिणीद्वारे काढली अंडकोषातील गाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

तैवान, कोरियापासून सुरवात 
‘नोट्‌स’ पद्धतीने स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेची सुरवात ही तैवान, बेल्जियम व कोरियात झाली होती. इंटरनॅशनल नोट्‌स सर्जरी सोसायटीकडून प्रशिक्षण घेऊन डॉ. सुयश नवाल यांनी ही भारतातील पहिली शस्त्रक्रिया केली.

जळगाव - स्त्रियांशी संबंधित असलेली अंडकोषातील गाठ काढण्यासाठी पोटावर चिरा मारून शस्त्रक्रिया करण्यात येत असते. यामुळे शरीरावर त्याच्या खुणा राहत असतात. परंतु, ‘नोट्‌स’ (नॅचरल ओरीफिस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) या नवीन पद्धतीद्वारे पहिली शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी करण्यात आली. या पद्धतीत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून अंडकोषातील गाठ योनी मार्गातून काढण्यात आली. 

दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया करताना पोटाला चिरा द्याव्या लागतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला टाके घातले जातात. परंतु ‘नोट्‌स’ या नव्या पद्धतीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये शरीरात असलेल्या नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्यात येत असते. या पद्धतीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करताना पोटावर एकही इजा न करता स्त्रीच्या अंडकोषातील गाठ योनी मार्गातून दुर्बिणीद्वारे काढण्यात आली. याच पद्धतीने गर्भपिशवी योनी मार्गातून दुर्बिणीद्वारे काढण्याची शस्त्रक्रिया नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. सुयश नवाल, डॉ. ऋचा नवाल, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. जयश्री राणे यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telescope natural orifice transluminal endoscopic surgery Health care