Dhule News| संशयितांची गय करणार नाही : किशोर काळे

Anup Aggarwal while interacting with the crowd present at the office of the Superintendent of Police in the case of stone pelting.
Anup Aggarwal while interacting with the crowd present at the office of the Superintendent of Police in the case of stone pelting.esakal

धुळे : शिवजयंतीला शहरात रविवारी (ता. १९) काही समाजकंटकांनी चाळीसगाव रोड युवक शिवजयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली.

या प्रकरणी संतप्त (Angry) जमावाने सोमवारी (ता. २०) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. (Testimony of Additional Superintendent of Police Kishor Kale to victims of stone pelting dhule news)

तेथे शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी चौकशीतून दगडफेक करणारे संशयित निष्पन्न करणे आणि संशयितांची गय केली जाणार नाही, असे आश्‍वासन श्री. काळे यांनी दिले.

अपर पोलिस अधीक्षक काळे यांच्याशी भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, हिरामण गवळी, दीपक खोपडे, ॲड. रोहित चांदोडे, जीवन शेंडगे, कुणाल रायकर, सचिन शेवतकर व अन्य प्रतिनिधींसह पीडित नागरिक, जखमी महिलांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.

त्यानुसार मिरवणुकीवर दगडफेकीत १७ महिला जखमी झाल्या. त्यामुळे शिवप्रेमी व चाळीस गाव रोड युवक शिवजयंती उत्सव समितीसह रहिवाशांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यात समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मिरवणुकीवर दगडफेकीतून दहशत निर्माण करणे, याद्वारे जमिनी कवडीमोल भावाने घेण्याचा ठराविक समाजकंटकांचा डाव असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Anup Aggarwal while interacting with the crowd present at the office of the Superintendent of Police in the case of stone pelting.
Dhule News : हद्दवाढ क्षेत्रातील 70 कर्मचारी मनपा सेवेत; नियुक्तीचे आदेश वितरित

चाळीसगाव रोड परिसरातील पवननगर, मारोतीनगर, विठ्ठलनगर, सप्तश्रृंगीनगर, जळगाव जनता बँक कॉलनी, मिरजकरनगर, राजे शिव कॉलनी, सुगंधनगर, कोरकेनगर, जीजाई सोसायटी, राजवाडे नगर, नरेंद्र चौक या परिसरातील शिवप्रेमींनी चाळीसगाव रोडवरुन मिरवणूक काढली. त्यावेळी एका हॉस्पिटलसमोर ठराविक समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली.

मिरवणुकीत आठशे ते हजार महिला, हजार ते दीड हजार पुरुष होते. भविष्यात असले प्रकार घडू नये यासाठी समाजकंटकांवर कारवाई करावी. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यासमोरील शंभर फुटी मार्गावर दररोज ३० ते ४० ठराविक समाजकंटक नशेखोरी करतात.

महिलांची छेड काढतात. अशोभनीय कृत्य करतात. त्यामुळे रोज रात्री पोलिस पथकाने गस्त घालावी, अशी मागणी श्री. अग्रवाल यांच्यासह शिष्टमंडळाने केली. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेप्रकरणी विनायक महादू कोठावदे (वय ५१, रा. पवननगर, पश्‍चिम हुडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात चौकशीसाठी पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

Anup Aggarwal while interacting with the crowd present at the office of the Superintendent of Police in the case of stone pelting.
Dhule News : साताऱ्यातून संशयित गजाआड; एलीसीबीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com