जळगाव- आधुनिक सॉफ्टवेअरच्या जगात नव्यानेच गिबली हे सॉफ्टवेअर ‘लॉन्च’ झाले आहे. कधीकाळी कार्टून म्हटले, की लाजीरवाणे वाटणारा माणूस आता स्वतःहून कार्टून करवून घेण्यासाठी उतावीळ झाला आहे. नेता, अभिनेता कलावंतांनी असे गिबली कार्टून सोशल मीडियावर टाकल्याने अक्षरशः या ‘गिबली’ची त्सुनामीच आल्याचा अनुभव होतोय.