
नंदुरबार ः सीआयडी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत नंदुरबारात एका ७० वर्षीय वृध्दाकडे ५० हजाराची रोकड व अडीच लाखाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली.
आवश्य वाचा- शोधून शोधून थकली..व्याकूळ होवून बसली; अचानक ‘आऽऽई’ हा शब्द कानावर आला आणि सारेच निशब्द!
याप्रकरणी दोन अज्ञातांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील आदेश्वर नगरात राहणारे खेतमल मिश्रीलाल जैन ( वय ७० ) हे डि.आर.हायस्कूल ते महाराणा प्रताप चौकादरम्यान रस्त्याने जात होते.
मागून दोन जण आले अन...
खेतमल हे जात असतांना त्याच्या मागून दोन अज्ञात व्यक्ति आले. आणि खेतमल जैन यांना म्हणाले, आम्ही सीआयडीचे पोलीस निरीक्षक आहे असे सांगुन दिशाभूल केले. व खेतमल जैन यांच्याकडील ५० हजाराची रोकड व २ लाख ५० हजाराची सोन्याची चैन व अंगठी चोरुन नेली.
आवश्य वाचा- गांजा माफियांची अजब युक्ती; गाडीवर चक्क महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून तस्करी
पैसे दागिने घेवून चोरटे पसार
खेतमल यांच्याकडील पैसे, चैन,अंगठी घेवून दोघे चोरटे मुद्देमाल घेवुन पसार झाले. याबाबत खेतमल मिश्रीलाल जैन यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बिन्हाडे करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे