Dhule Crime News : ग्रामीण भागातही चोरटे सक्रिय; मेथीत 2 घरफोड्या

burglary
burglaryesakal
Updated on

चिमठाणे (जि. धुळे) : मेथी (ता. शिंदखेडा) येथे गुरुवारी (ता. २४) रात्री चोरट्यांनी चौधरी गल्लीतील दोन बंद घरांना लक्ष करीत दोन्ही घरांतील कुलपे तोडून साडेपाच तोळे सोने व दहा हजार रुपयांच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला. शुक्रवारी (ता. २५) घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ दाखल झाले असून, श्वानपथकाने मराठीपर्यंत चोरट्यांचा माग दाखविला, तर ठसेतज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे  निरीक्षक सुनील भाबड मेथी गावात तळ ठोकून बसले होते.शिरपूर उपविभागीय अधिकारी दिनेश आहेर यांनीही दुपारी घटनास्थळी भेट दिली. (Thieves also active in rural areas 2 house burglaries in Methi Dhule Latest Crime News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

burglary
Jalgaon Milk Union Fraud : संशयितांना जिल्हा न्यायालयाचा जामीन; दूध संघ आवारात जाण्यास मनाई

शिंदखेडा शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी रात्री मेथी येथे चौधरी गल्लीत राहणारे  श्यामराव चिंतामण माळी (चौधरी) मुलाने पुण्यात नवीन घर घेतल्याने सामान पोचविण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. चोरट्याने कुलूप तोडून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घरासमोरील गल्लीत राहणारे जितेंद्र मोतीलाल चौधरी हेही मुंबईला गेले होते.

त्यांच्याही घराचे कुलूप चोरट्यांनी  तोडून दहा हजारांची रोकड व पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. दोन्ही व्यक्ती घरी नसल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. याबाबत चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत असल्याने ज्यांना बाहेरगावी जायचे आहे त्यांनी शेजाऱ्याला सांगून जावे वा मौल्यवान वस्तू सोबत नेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेथी दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने पाहणी करताना पोलिस निरीक्षक सुनील भाबड व पोलिस नाईक प्रशांत पवार. चोरट्यांनी कपाटातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलेला.

burglary
Jalgaon District Milk Union Election : दूध संघ वाचविणे हेच आमचे ध्येय : गुलाबराव पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com