दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरांनी साधली संधी

अंबादास बेनुस्कर : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

किराणा व्यावसायिकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी रोख रकमेसह १ लाख २५ हजार रुपये व ३ तोळे सोन्याची मंगळपोत असे एकूण २ लाख किमतीचा ऐवज लंपास केला. दिवाळी पूर्वीच चोरटय़ांनी आपल्या अस्तित्वाची झलक दिली असल्याने पोलिसांना याचा गंभीर विचार करावा लागेल.
   

पिंपळनेर : किराणा व्यावसायिकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरटय़ांनी रोख रकमेसह १ लाख २५ हजार रुपये व ३ तोळे सोन्याची मंगळपोत असे एकूण २ लाख किमतीचा ऐवज लंपास केला. दिवाळी पूर्वीच चोरटय़ांनी आपल्या अस्तित्वाची झलक दिली असल्याने पोलिसांना याचा गंभीर विचार करावा लागेल.
   

दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरांनी साधली संधी

साक्री तालुक्यातील दिघावे येथे किराणा व कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय करणारे  तसेच पिंपळनेर येथील मोर्या सोसायटीत राहणारे हेमंत गोविंद भामरे (वय ३९)हे रविवारी (ता.१३) आपल्या मुळगावी दिघावे येथे पत्नी व मुलांसोबत राहण्यास गेले होते. गावाला जाण्यापूर्वी घराला व कंपाऊंडच्या गेटला कुलुप लावून गेले होते. सोमवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजेला घरा शेजारील दिपक चौधरी यांनी हेमंत भामरे यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून सांगितले की तुमचे घराच्या दरवाजाला फक्त कडी लावलेली आहे व कंपाऊंडच्या मेनगेटला कुलुप लावले आहे असे का? असा प्रश्न करून हेमंत भदाणे यांना समज दिली. लगेचच हेमंत भदाणे पिंपळनेरला घरी आल्यावर दरवाजाची कडी तोडलेल्या अवस्थेत होती. आत प्रवेश केला असता कपाटातील धंद्याचे रोख ४५ हजार रुपये व वाहन घेण्यासाठी नातेवाईकांकडून ६० हजार रुपये असे १ लाख २५ हजार रुपये रोख व तीन तोळ्याची सोन्याची पोत ६० हजार रुपये असा १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले. याबाबत  पिंपळनेर पोलिसात हेमंत भदाणे यांनी लेखी फिर्याद दिली. या बाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हांडोरे हे करीत आहेत.
 

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

कुलूपबंद घराला लक्ष्य करीत घरफोडी केली असल्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दिवाळीचा सण जवळ आल्याने तो साजरा करण्यासाठी येथील नोकरदार वर्ग आपल्या गावी गेले असल्याने  त्याचाच फायदा चोरटय़ांनी रविवारी पहाटे उचलला.सध्या दिवाळी सणाचे दिवस आहेत. मुलांना सुटी लागल्यानंतर बाहेर गावी जावे की नाही ? असा प्रश्न सोसायटीतील कुटुंबियांना पडला आहे. दरम्यान घराला कुलूप असल्याचा नेमका फायदा घेत चोरांना मोरया सोसायटीतील घर फोडण्यात यश आले.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड व सहकारींनी घटनास्थळी पहाणी व पंचनामा केला.
 

प्रतिक्रिया

"सोसायटी परीसरातील नागरिकांनी घराबाहेरील लाईट रात्रीच्या वेळी सुरू ठेवावा संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी" -पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves seize the opportunity to take advantage of Diwali holiday