प्रशासन सुस्त..जनता त्रस्त..'या' गावाची ही कहाणी..

अंबादास बेनुस्कर : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

एकाच दिवशी शहरातील तिघांचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळनेरसह परिसरात पाण्यामुळे डबक्यांचे साम्राज्य व अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मलेरीया, टायफाईड, न्यूमोनिया, डेंग्यु, थंडी तापाची साथ पसरली आहे. घराघरात रूग्ण वाढत आहेत. पिंपळनेर शहरातील नामांकित दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच अवघ्या एका महिन्याच्या आत अनेक रुग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने त्रस्त असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 
डेंग्युचे अजून किती बळी?
गेल्या महिन्यात सामोडे व रामनगर भागातील डेंग्युसदृश आजाराने  दोन युवकांचा बळी गेला. त्यापाठोपाठ महेंद्र अमृत अहिरे (वय ४१) यांचे धुळे येथे उपचार घेतांना निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पिंपळनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले होते.
 दुसऱ्या घटनेत संभाजी नगर मधील संगिता किरण शिनकर (वय ४३) पिंपळनेर यांचाही आज (ता.७) सकाळी ७ वाजून १५ वाजता डेंग्यु सदृश आजाराने मृत्यू झाला. 
तर अलंकापुरी नगरचे फळविक्रेते विनोद एकनाथ मोरे  यांचा एक वर्षाचा मुलगा रितिक ऊर्फ बाबू विनोद मोरे हा बालक एक आठवड्यापासून आजारी होता. त्यास पिंपळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून धुळे येथे हलविण्यात आले. 
आज (ता.७) पहाटे त्या बालकाचाही नाशिक येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यास न्यूमोनिया व डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली होती. 

एकाच दिवशी तिघांचा डेंग्यूने मृत्यू
एकाच दिवशी शहरातील तिघांचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळनेरसह परिसरात पाण्यामुळे डबक्यांचे साम्राज्य व अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मलेरीया, टायफाईड, न्यूमोनिया, डेंग्यु, थंडी तापाची साथ पसरली आहे. घराघरात रूग्ण वाढत आहेत. पिंपळनेर शहरातील नामांकित दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच अवघ्या एका महिन्याच्या आत अनेक रुग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने त्रस्त असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
प्रशासनाचा ढिम्म कारभार

गेल्या महिन्यात 20 तारखेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्तू गुरव,शहरप्रमुख महेश वाघ,अजय सुर्यवंशी,राहुल पाटील, पंकज जाधव,बाळा चौरे,आदिंनी अप्पर तहसीलदार विनायक थवील,सरपंच साहेबराव देशमुख,उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी डी.डी.चौरे तसेच प्रभारी डॉ.निलेश भामरे यांना स्वतंत्र निवेदनही देण्यात आले होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three died of dengue-like illness in pimplener