पारनेर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान

मार्तँड बुचुडे
सोमवार, 25 जून 2018

पारनेर - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परीषदेसाठी निडणुक होत आहे. निवडणुक आयोग व कायदा आणि सुव्यस्थेचा एक भाग म्हणून मतदान असणा-या तालुक्यातील दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवल्याने शिक्षक दारू पितात यावर सरकारी यंत्रणेसह दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने शिक्का मोर्तब केले आहे.

पारनेर - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परीषदेसाठी निडणुक होत आहे. निवडणुक आयोग व कायदा आणि सुव्यस्थेचा एक भाग म्हणून मतदान असणा-या तालुक्यातील दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवल्याने शिक्षक दारू पितात यावर सरकारी यंत्रणेसह दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने शिक्का मोर्तब केले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज सोमवारी निवडणून (ता. 25) होत आहे. त्यासाठी सुशिक्षित व जागृक मतदारच नव्हे, तर मुलांना जिवनाचे धडे देणारे शिक्षक मतदार आहेत. या निवडणुकिसाठी असणा-या सुशिक्षित मतदारांनाही ऊमेद्वराने बंद पाकीटे वाटल्याची तसेच काही ऊमेद्वाराने काही ठिकाणी साड्या वाटल्याची चर्चा अता रंगली आहे. इतकेच नव्हे तर याचा निषेध म्हणून वाटलेल्या साड्यांची होळी केल्याचेही सोशल मेडीयावर दिसत आहे. 

एवढ्यानेही अता ही शिक्षक निवडणुक थांबली नाही, तर ज्या जिल्ह्यात ही निवडणुक आहे त्या जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सलग तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दारूबंदी ऊत्पादन शुल्क विभागाने दिले आहे. शिक्षकांच्या निवडणुकीतही दारू विक्री बंद ठेवावी लागली याचाच अर्थ  दारूबंदी ऊत्पदन शुल्क विभागासह सरकारनेही व निवडणुक आयोगानेही शिक्षक दारू पितात यावर जणू शिक्क मो्र्तब केले आहे. 

गुरूजींवर अत्ता पर्यंत अनेक आरोप झाले आहेत त्यातच हा नवा आपवादही  गुरूजींवर आला आहे.  सलग तीन दिवस (ड्राय डे ) दारू दुकाणे बंद का असा प्रश्न अनेक जण दुकानदारांना विचारतात त्यावर दुकाणदार शिक्षक आमदारांची निवडणुक आहे व त्यासाठी शिक्षक मतदार आहेत हे सांगावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकही दारू पितात हे समजल्यावर पिणाराही आनंदीत होताना दिसत आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी नगरसह धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विध्यालयातील शिक्षकांचे मतदान आहे. जिल्ह्यात 12 हजार 882 तर एकूण 53 हजार 335 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today's poll for the election of Parner-teacher constituency