जामनेर- शहरातील वाकी रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया व टपाल कार्यालयाजवळ एका ट्रॅक्टरचालकाने आठ ते दहा दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवारी (ता.२८) दुपारी झाला.