निमगूळ- दोंडाईचा-शहादा उड्डाणपुलावर रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर उड्डाणपुलाखाली जाऊन कोसळला, तर रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षामधील धावडे (ता. शिंदखेडा) येथील मीनाबाई भुरेसिंग गिरासे (वय ५०) ठार झाल्या, तर ओंकारसिंग हमरसिंग गिरासे (५२), सुवर्णा आनंदसिंग गिरासे (४०), सिंधूताई सुभाष गिरासे (५५, तिघे रा. निकुंभे), सुरेसिंग भीमसिंग गिरासे (५५, रा. धावडे), विमलबाई दिलीपसिंग गिरासे (४५, रा. मेथी) गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.