डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराची क्रेझ कायम

Social-Media.jpg
Social-Media.jpg
Updated on

मनमाड : निवडणुकीत प्रभावी ठरलेल्या सध्याच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात पारंपरिक प्रचाराचा बाज आजही कायम असल्याचे चित्र आहे. भाषण, लाऊसस्पीकर, पत्रके, ध्वज, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. यामुळे डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार कायम असल्याचे चित्र आहे.

राजकारणातही सोशल मिडीया माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर
कुठलीही निवडणूक म्हटली की प्रचार आलाच परंतु पूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक यात चांगलाच फरक दिसून येतो. पूर्वी साधनांची कमतरता होती. मात्र आता साधनांची मुबलकता आहे. बदलत्या काळानुसार प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी माध्यमातून प्रत्येकजण व्यक्त होऊ शकतो. राजकारणातही या माध्यमांचा वापर मोठ्या खुबीने सध्या केला जात आहे. विशेषतः लोकसभा निवडणूक ते ग्रामपंचायत निवडणुकांमधील प्रचारात या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे. उमेदवारांच्या भूमिका, पाठिंबा, प्रचाराचे नियोजन, प्रचाराचे व्हिडिओ, चिन्हांचा प्रसार आदींसाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमांद्वारे बहुतांशी तरुणवर्गापर्यंत 
पोहोचण्याची संधी उमेदवारांना मिळत असल्याने या सोशल, डिजिटल प्रचारासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहेत. प्रत्येक उमेदवाराने त्यासाठी एक्टिव्ह' तरुणांची तर काहींनी संस्थांची नेमणूक केली आहे. उमेदवार, चिन्हांचे फोटो प्रचार फेऱ्या, सभेचे फोटो, व्हिडिओ आणि उमेदवारांचा चेहरा अधिकाधिक गतीने लोकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम म्हणून या डिजिटल मीडियात विशेष पसंती मिळत आहे. या माध्यमांमुळे पारंपरिक प्रचाराचा बाज कमी होत चालल्याची चर्चा असली तरी आजही त्याचे अस्तित्व पाहायला मिळत आहे.

डिजिटल युगातही भाषणे करावीच लागतात
विधानसभा निवडणूक प्रचारात डिजिटल सही पारंपरिक प्रचारावर ही भर 
देण्यास उमेदवारांकडून प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी पेंटरकडून भिंती रंगवून, प्रचार बॅनर तयार केले जात, आता मात्र फ्लेक्स बोर्ड आले, कार्यकर्ते पक्षविचाराचे इतके पक्के की घरून भाकरी बांधून प्रचाराला येत मात्र आता पैसे देऊन रोजाने माणसे आणले जातात. त्यांच्या जेवणावळी आयोजित कराव्या लागतात. परंतु या डिजिटल युगातही भाषणे करावीच लागतात, रिक्षा व इतर गाड्या लावून ध्वनिक्षेपकाद्वारे मतदानाचे आवाहन करावा लागतो, प्रचार पत्रके वाटावीच लागतात, ध्वज, मफलर, टोपी यांचीही क्रेझ कायम आहे डिजिटल चे गुण गाण कितीही गायले तरी या पारंपरिक प्रचाराचा बाज कायम असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. उमेदवारसुद्धा पदयात्राच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराची क्रेझ कायम असल्याचे चित्र आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com