जळगाव- जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रोड) काम सुरू आहे. दिवसरात्र परप्रांतीय व काही स्थानिक मजूर त्याठिकाणी काम करतात. रस्ता सामान्य वाहतुकीसाठी बंद आहे. सोमवारी (ता. १०) रात्री काम संपवून मजूर रस्त्यालगतच झोपी गेले. अज्ञात वाहनाच्या रूपाने काळाचा घाला अंगावरून निघून जाईल, अशी कल्पनाही त्यांनी केली नसावी. अन् नेमके तेच घडले. अवजड वाहनाने चिरडल्याने तीन मजुरांचा गाढ झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाला.