जळगाव- गव्हाने भरलेला तमिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगरकडून बोदवडकडे येत असताना बंद असलेले रेल्वेगेट तोडून थेट अमरावती एक्स्प्रेसला धडकला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच तास रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यात तीन रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला; तर दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. घटनास्थळी बोदवड पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रेल्वेचा आपत्कालीन विभाग पोहोचला आहे.