नंदुरबार- ट्रकमधील मालाची परस्पर विक्री करून त्या पैशांसाठी सहचालकाचाच खून केल्याची घटना सहा वर्षांपूर्वी विसरवाडी पोलिस ठाणे हद्दीत घडली होती. न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाल्याने नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. .ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक सुनीलभाई गिरधारीलाल गुप्ता (रा. मरोली, नवसारी, गुजरात) यांच्याकडे इंद्रदेव ओमप्रकाश यादव (वय २४, रा. अमारी, पो. शिवगड, ता. लंबुआ, जि. सुलतानपूर) २२ डिसेंबर २०१९ ला ट्रकमध्ये माल भरून सुरतला पोहोचविसाठी निघाला. मात्र, माल सुरतला न पोहोचल्याने गुप्ता यांनी चौकशी केली असता, चालक इंद्रदेव याचा मोबाईलवर संपर्क होत नव्हता. अधिक चौकशी केली असता, इंद्रदेव यादव याच्या ताब्यातील ट्रक (जीजे २१, डब्ल्यू ६९७१) धुळे-सुरत महामार्गालगत मिळून आला. .मात्र, चालक इंद्रदेव यादव मिळून आला नाही. दुसऱ्या चालकाकडून माहिती घेतली असता, इंद्रदेव यादव त्याच्या गावाजवळ राहणाऱ्या मानसिंग पटेल याच्यासोबत जाणार असल्याचे समजले, तसेच मानसिंग पटेल धुळ्याच्या एका भंगार विक्रेत्याला ट्रकमधील माल विकणार असल्याचीही माहिती मिळाली. त्यावरून गुप्ता यांनी स्वतः धुळे येथील भंगार विक्रेत्याकडे जाऊन विचारपूस करता, मानसिंग पटेल ट्रक घेऊन आपणाकडे माल विकण्यासाठी आल्याचे भंगार विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे गुप्ता यांनी मानसिंग पटेल याच्याशी संपर्क केला असता, संपर्क झाला..त्यानंतर दोन दिवसांनी विसरवाडी पोलिस ठाणे हद्दीत मिळालेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असता, तो मृतदेह चालक इंद्रदेव यादव याचा असल्याचे समजले. याबाबत गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास विसरवाडीचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी करून पुरावे जमा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. .या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. तुषार कापडिया यांनी साक्षीदार तपासले. फिर्यादी, पंच व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने मानसिंग बैजनाथ वर्मा (२४, रा. रत्नागरपूर, ता. पट्टी, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.