बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दरोड्याचा प्रयत्न

महेंद्र साळुंखे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सामनेर (जळगाव) : पाचोरा तालुक्यातील नांद्रा व सामनेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शाखेत सायरन वाजल्याने दरोडय़ाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

सामनेर (जळगाव) : पाचोरा तालुक्यातील नांद्रा व सामनेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शाखेत सायरन वाजल्याने दरोडय़ाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

त्यानंतर दरोडेखोरांनी सामनेर मध्यवर्ती गावात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सामनेर शाखेत सीसीटीव्ही कॅमेरा वाकवून, इलेक्ट्रीक मीटर तोडून वीजपुरवठा बंद करून शेजारील लोखंडी हत्याराच्या सहाय्याने शटर तोडत असताना अडीच वाजेच्या सुमारास बँकेच्या शेजारील रहिवासी भगवंतराव साळुंखे व डॉ. सागर सोनकुळ यांना जाग आली. यांच्या सतर्कतेने शेजारील व बँकेचे शिपाई प्रवीण शिंगणे व योगेश पाटील, साहेबराब साळुंखे यांना फोन करून बोलावून आरोळ्या मारल्याने मोटरसायकल वरून माकड टोपी व जॅकेट घातलेल्या 3 व्यक्ती पसार झाल्या.

यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनला कळवले असता पीएसआय गणेश चौभे आपल्या पथकासह नांद्रा येथून सामनेरला दाखल झाले. दोन्ही शाखांची पाहणी केली असता सामनेर शाखेत तिसऱ्या वेळेस प्रयत्न झाला असून बँकेच्या शेजारी असलेल्या नागरिकांमुळे तिन्ही वेळेस दरोडेखोर असफल झाले आहेत. बँकेचे शाखा व्यवस्थापक वेदप्रकाश द्विवेदी यांनी शाखेतील सुमारे 7 लाख रुपयाची व मुद्देमाल शाबुत असल्याचे सांगितले. 

Web Title: Try to Decoit at Bank Of Badoda in pachora Jalgaon