
अबब! सारंगखेडा अश्वबाजारात कोट्यावधींची उलाढाल
शहादा : सारंगखेडा येथील अश्वबाजाराने अवघ्या पाच दिवसांत कोटी रुपयांच्या उलाढालीच्या टप्पा पार केला असून, अश्वशौकिनांची गर्दी वाढत आहे. रविवारी (ता. ११) दिवसभरात ५२ घोड्यांची विक्री झाली असून, सर्वाधिक किमतीची मथुरा येथील जुमानभाई अल्लाबक्ष चौहरी यांची सात लाख रुपयांची घोडी पालिपडियम (तमिळनाडू) येथील जे. विजयलक्ष्मी यांनी खरेदी केली.
हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
हेही वाचा: Horse Market : 61 लाखांच्या घोडीने वेधले लक्ष; लाखोंची उलाढाल
येथील अश्वबाजारात उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असून, विविध प्रांतांतून घोडे विक्रेते दाखल झाले आहेत. त्याचबरोबर खरेदीदारही देशभरातून येत असल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साह चांगला आहे. रविवारपर्यंत ३८० घोड्यांची विक्री झाली असून, एक कोटी २५ लाख ७१ रुपयांच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा: Horse Funeral : बळीराजाची अशीही कृतज्ञता; कवडदरात होणार घोड्याची दशक्रिया