धुळे : तीन बालकांचा डोहात बुडवून दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unfortunate death of three children by drowning

धुळे : तीन बालकांचा डोहात बुडवून दुर्दैवी मृत्यू

पिंपळनेर - येथील इंदिरानगर भागातील रहिवासी नौमान शेख, आयान शहा, हुजेफ मन्सुरी हे तिन्ही बालक मदरसा सुटल्यानंतर डोहात पोहण्यासाठी गेले असता तिघांचा डोहात बुडवून दुर्दैवी मृत्यू, पिंपळनेर पोलिसात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपळनेर शहरातील इंदिरानगर भागातील गरीब मुस्लिम समाजातील नौमान मुख्तार शेख (वय 16 वर्ष) इयत्ता दहावी, आयान शफी शहा (वय 12 वर्ष) इयत्ता सहावी, हुजेफ हुसेन मन्सुरी (वय 11 वर्षे) इयत्ता पाचवी, यांच्यासह दोन मित्र सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मदरसा सुटल्यानंतर खेळण्यासाठी जेबापूर रस्त्यालगत असलेल्या बिजासनी रो-हाऊस जवळील टेकडी जवळील मुरूम खोदलेल्या पावसाळी पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले असता. नौमन शेख, आयान शहा, हुजेफ मन्सुरी हे तिन्ही आपले कपडे काढून पोहण्यासाठी डोहाजवळ थांबले व त्यांचे दोन मित्र जवळच्या ग्राउंड जवळ खेळण्यासाठी गेले.

आपले तिन्ही मित्र अजून का येत नाहीत हे पाहण्यासाठी डोहाजवळ गेले असता त्यांना त्या ठिकाणी डोहाबाहेर कपडे काढलेले दिसले. त्यांना शंका आल्याने घाबरून त्यांच्या परिवाराकडे न जाता घराकडे परत येऊन गौतम भटू पवार (पहिलवान) यांना घटनेची कल्पना दिली. गौतम पवार यांनी लगेच पिंपळनेर पोलिसात खबर देऊन आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या डोहात उतरून शोधाशोध केली. डोहात तळाला हे तिन्ही बालक हाती लागल्याने या बालकांना बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची पिंपळनेर शहरात वार्या सारखी बातमी पसरताच रुग्णालयाकडे असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. तर शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला असून रुग्णालयात बालकांचे शव विच्छेदन करून बालकांना त्यांच्या कुटुंबाकडे देण्यात आले. यावेळी बालकांच्या घराजवळ असंख्य लोकांनी गर्दी केली होती. शोक मग्न वातावरणात कब्रस्तान मध्ये बालकांवर दफन विधी करण्यात आले. यावेळी आमदार मंजुळाताई गावित यांनी कुटुंबाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले.

या बालकांना डोहातून काढण्यासाठी बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपचे गौतम भटू पवार, मुश्रफ शेख, समर्थ पगारे, अश्रफ पठाण यांनी विशेष सहकार्य केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक भाईदास मालचे हे करीत आहेत.

Web Title: Unfortunate Death Of Three Children By Drowning In Pimpalner Dhule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top