Dhule News : प्रशासन-नागरिक समन्वयातून अनोखे मॉडेल; शिरपूर पालिका राज्यात अव्वल

Shirpur Municipality
Shirpur Municipalityesakal

Dhule News : राज्यात प्रथम क्रमांकाचा शहर सौंदर्यीकरण पुरस्कार पटकावतानाच शिरपूर पालिकेने आपल्या गटातील सर्वोच्च करवसुलीचा पुरस्कार मिळवून राज्याचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव स्वीकारल्यानंतर शिरपूर पालिकेच्या करवसुली मॉडेलची चर्चा सुरु झाली असून त्यातील सातत्याचा अन्य पालिकांनीही अभ्यासही सुरु केला आहे. (unique model of governance citizen coordination Shirpur Municipality top in state Dhule News)

करवसुली ही पालिकेसारख्या संस्थांची मोठी डोकेदुखी असते. लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने तो अप्रिय विषय असतो तर प्रशासनासाठी प्रसंगी ती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी बाब ठरते. शिरपूरला मात्र निराळी परिस्थिती दिसून येते.

कर देण्याची शिस्त वर्षानूवर्षे येथील मालमत्ताधारकांच्या अंगवळणी पडली आहे. दरवर्षीचे नैमित्तिक कृत्य म्हणून करांचा भरणा करताना अपवाद वगळता कोणाकडूनही खळखळ होत नाही हे विशेष..! त्यामुळे दरवर्षी ९२ ते ९५ टक्क्यांहून अधिकची करवसुली करणे पालिका प्रशासनाला शक्य झाले आहे.

कर द्या, सुविधा घ्या

राज्यातील पालिका गटात आपल्या स्तरावर सर्वाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांमध्ये शिरपूर पालिकेचा समावेश होतो. १९८५ मध्ये आमदार अमरिशभाई पटेल यांनी पालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुविधा हव्या असतील तर करांचा भरणाही करावा लगेच या तत्त्वाचा अवलंब केला.

त्याचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जयश्रीबेन पटेल यांनीही केला. त्यामुळे आजतागायत पालिकेची करवसुलीची परंपरा टिकून आहे. २४ तास पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजना, दाराशी येऊन कचरा संकलन करणारी घंटागाडी,

उद्याने, संपूर्ण काँक्रिटीकरण, अद्ययावत व्यापारी संकुलांच्या माध्यमातून दिलेले रोजगाराचे साधन, सुसज्ज प्राथमिक व माध्यमिक, सांडपाणी शुद्धीकरण, खतनिर्मिती अशा विविध वैशिष्ट्यांनी पालिकेने सुविधा निर्माण केल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Shirpur Municipality
Ground Water Level Scheme : भूजलपातळी वाढवा, 50 लाख मिळवा! जिल्ह्यातील 116 गावांचा योजनेत सहभाग

प्रशासनाचे प्रयत्न

पालिका प्रशासनातर्फे राबवलेल्या विविध उपक्रमांचे करवसुलीमध्ये मोठे योगदान आहे. तिमाही पाणी करवसुलीसारखी योजना पालिकेचे प्रशासन राबवते. त्यात पाणीकरांची तिमाही बिले संबंधितांना दिली जातात.

त्यामुळे टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्याची सुविधा मिळते. तसेच, डिसेंबर-जानेवारीपासून पालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली विभागाचे कर्मचारी कर गोळा करण्याच्या मोहिमेवर निघतात. मालमत्ता धारक, नळ जोडणी धारकांकडे सातत्याने तगादा लावून, पाठपुरावा करीत ते रकमा गोळा करतात.

त्यामुळे करवसुली सुलभ ठरते. अन्य पालिका वसुलीसाठी धडक मोहिमेला सुरवात करतात, तोवर शिरपूर पालिकेची करवसुली संपते. प्रशासनाचे चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रयत्न हेदेखील येथील करवसुलीचे गमक आहे.

लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याच्या कालावधीत प्रशासक म्हणून प्रांताधिकारी प्रमोद भामरे, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी सत्यम गांधी, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी कल्याणी लाडे, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी आदींनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Shirpur Municipality
Nashik News : ई-लर्निंगसाठी 5 वर्षे मोफत इंटरनेट सेवा; वणीच्या रघुनाथ घाडगे यांच्यातर्फे सुविधा

नागरिकांची सद्भावना

नागरिकांची पालिकेप्रति असलेली सद्भावना हादेखील करवसुलीसाठी महत्त्वाचा घटक ठरतो. किमान शुल्क आकारून गरजेनुसार अंत्ययात्रेसाठी वैकुंठरथ पालिका उपलब्ध करून देते. पालिकेसंदर्भात वैयक्तिक समस्यांची तक्रार केल्यावर तिचे तातडीने निराकरण केले जाते.

अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे उपलब्ध करून दिली जातात. दारासमोर आलेल्या घंटागाडीत कचरा विलगीकरण करून टाकण्यासाठीही सफाई कर्मचारी असतो. अशा सुविधांमुळे येथील रहिवाशांच्या मनात आपसूकच जिव्हाळा तयार होतो.

"शिरपूरच्या नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून मिळालेल्या सुख-सुविधांची जाणीव आहे. कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय नागरिकांची अडलेली कामे पालिकेचे अधिकारी लगेचच करून देतात. पारदर्शक कारभारामुळे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही करीत राहिलो. त्यातून येथील नागरिकांशी आमचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून करवसुलीसारख्या कठोर म्हटल्या जाणाऱ्या प्रक्रिया शिरपुरात अत्यंत सुरळीत पार पडतात." -भूपेशभाई पटेल

Shirpur Municipality
Summer Onion Crisis : उन्हाळी कांदा टिकविण्याचे बळिराजापुढे आव्हान! अवकाळी पावसामुळे कांदा सडतोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com