भुसावळ- मार्च महिना संपण्याचा मार्गावर असतानाच सूर्य हळूहळू आग ओकू लागला आहे. रात्रीची थंडी कमी होऊन उष्णतेच्या झळा बसत आहेत. चटकेदार उन्हाळ्यात पिण्याचे पाणी थंडगार मिळावे म्हणून शहरातील बाजारात मातीच्या घागरी, माठ विक्रीला आले आहेत. पूर्वी काळ्या आणि लाल रंगाचे माठच बाजारात मिळत होते.