Latest Marathi News | वर्षा घुगरी यांची धुळे मनपात बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : वर्षा घुगरी यांची धुळे मनपात बदली

धुळे : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांची धुळे महापालिकेत बदली झाली आहे.

दरम्यान, सौ. घुगरी यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंतापदी रवींद्र रतन पाटील यांची नियुक्ती झाली. श्री. पाटील यांची महापालिकेतून तेथे बदली केल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, श्री. पाटील हे धुळे महापालिकेत रुजूच झाले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. (Varsha Ghughri has been transferred to Dhule Municipality dhule news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या/पदस्थापना करण्यात आल्या आहेत. येथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्वीकारावा व तसा अहवाल शासनास विनाविलंब सादर करावा.

संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करावे, पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असे बदली आदेशात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच सौ. घुगरी यांच्याविरोधात कर्मचारी, उपअभियंत्यांनी आंदोलन करत अधीक्षक अभियंत्यांना तक्रारीचे निवेदन दिले होते. यानंतर बदलीच्या घडामोडी घडल्याचे मानले जाते.

हेही वाचा: Jalgaon News : 400 वर जोडप्यांच्या ‘मनोमिलना’ त महिला कक्षास यश