VijayKumar Gavit : ''माशाच्या तेलामुळे त्वचा ही चांगली दिसते, मुली लगेच पटणार'' गावितांचा अजब दावा

VijayKumar Gavit : ''माशाच्या तेलामुळे त्वचा ही चांगली दिसते, मुली लगेच पटणार'' गावितांचा अजब दावा

VijayKumar Gavit : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री विजयकुमार गावित हे सध्या केलेल्या विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

राजकीय सभा जर गाजवायची असेल आणि उपस्थितांची वावा हवी असेल तर कित्येकदा राजकीय नेते असं काही बोलून जातात की त्याचे पडसाद विविध माध्यमातून उमटायला सुरुवात होते.

VijayKumar Gavit : ''माशाच्या तेलामुळे त्वचा ही चांगली दिसते, मुली लगेच पटणार'' गावितांचा अजब दावा
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात साथीच्या आजाराचे थैमान ; लेप्टोचा एक बळी तर ..

यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्य सरकारमधील मंत्री विजयकुमार गावित यांचे वक्तव्य चर्चेत आले आहेत. मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या राय सारखे होतात असा अजब दावा गावित यांनी केला आहे. धुळ्यातील एका कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

VijayKumar Gavit : ''माशाच्या तेलामुळे त्वचा ही चांगली दिसते, मुली लगेच पटणार'' गावितांचा अजब दावा
Maharashtra Politics: पवार, ठाकरेंना सोडून काँग्रेस एकट्याने निवडणूकांची तयारी करतयं?

विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणामध्ये मासे खायचे फायदे सांगितले. यावेळी ऐश्वर्या रायला तुम्ही बघितले का? नियमित मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले आहेत. ती समुद्रकिनारी राहते. ती दररोज मासेव खायची. यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुमचेही डोळे तसेच होणार जर तुम्ही मासे खाल असं विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे.

VijayKumar Gavit : ''माशाच्या तेलामुळे त्वचा ही चांगली दिसते, मुली लगेच पटणार'' गावितांचा अजब दावा
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

याचबरोबर गावित असेही म्हणाले की, मासे खाल्ले कि माणसं चिकने दिसतात. डोळे तरतरीत दिसतात. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचा ही चांगली दिसते. कोणीही बघितलं तर लगेच पटणार. असं गावित म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com