पारोळा- तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोडण या गावात दर वर्षी विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावते. याशिवाय जवळच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे व पळासखेडे या गावांनादेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या पाच गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन चोरवड येथील शेतकरी छोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांना साकडे घालून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री पाटील जळगावला आले असता, त्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.