अमळनेर- तालुक्यातील तासखेडा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांमधील २२ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. .समीर नाना ठाकूर (रा. तासखेडा) याने फिर्यादीत म्हटले आहे की, २७ एप्रिलला पुतण्याने त्याच्या वाढदिवसाला शेतातील कामगारांना बोलावले होते. मात्र, त्यांना का बोलावले, या कारणावरून मंगल डोंगर भील व जगदिश मंगल भील यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ केली. त्यावेळी समीरचा भाऊ चेतन ठाकूर समजविण्यास गेला असता, त्याला मारहाण केली म्हणून चेतन ठाकूर याने पोलिसांत तक्रार केली. .पोलिस ठाण्यातही मंगल भील याने जीवे मारण्याची धमकी दिली. पुन्हा २९ एप्रिलला सायंकाळी साडेसहाला मंगल डोंगर भील, सुनंदा मंगल भील, भुरेश डोंगर भील, जगदीश मंगल भील, सतीश मंगल भील, किरण महारू भील, आशा महारू भील, ज्योती लोटन भील, मोनी नाना भील, वंदाबाई सोमा भील, अजय प्रताप भील, दीपक नाना भील हे लाठ्याकाठ्या घेऊन घरासमोर आले. पोलिसांत तक्रार केली म्हणून मंगल भील याने लाकडी दांडक्याने चेतन ठाकूरच्या डोक्यात मारून जखमी केले..इतरांनीही काठ्या व दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. समीर त्यांना आवरायला गेला असता, त्यांनी समीरलाही काठ्यांनी हातपाय व कमरेवर मारहाण केली. दरम्यान, जखमी चेतनला उपचारासाठी ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले. समीरच्या तक्रारीवरून सर्व १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत..दुसऱ्या गटातर्फे महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा मुलगा जगदीश २८ एप्रिलला ॲक्वाचे पाणी घ्यायला गेला असता, चेतन ठाकूरने माझ्याकडे का बघतो, म्हणून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. जगदीशने पोलिसांत फिर्याद दिली. २९ एप्रिलला सायंकाळी साडेसातला घराबाहेर शिवीगाळ करण्याचा आवाज आला. .चेतन नाना ठाकूर, सागर नाना ठाकूर, नीलेश रावसाहेब पाटील, रोहित रावसाहेब पाटील, विनोद चिंधा भील, अनिल सीताराम शिंदे, सनी चिंधा भील, आकाश सुनील भील, महेश रूपंचंद भील, एकनाथ आण्णा भील यांनी महिलेला शिवीगाळ केली. जगदीश व सतीश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. .Pune News: Bhise, Pawar टोळीतलं गँगवॉर, अंगावर काटा आणणारा CCTV पाहा | Mulshi Pattern.चेतनने जगदीशच्या डोक्यावर मारून दुखापत केली. सागरने भुरेशच्या पाठीवर व पायावर मारून दुखापत केली. जगदीशच्या डोक्यातून रक्त निघू लागले. महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व चांदीचे बेले तुटून नुकसान झाले. महिलेच्या तक्रारीवरून सर्व दहा जणांविरुद्ध गुन्हा केला असून हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.