जामनेर- वाघूर उपसा जलसिंचन योजनेंतर्गत जामनेर तालुक्यातील २७ गावांमध्ये दोन हजार २० शेततळे बांधण्यात येणार आहेत. त्यात वाघूर धरणाचे पाणी साठविले जाईल. हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, शाश्वत सिंचन सुविधेसोबतच भूजल पातळी सुधारण्यासदेखील मदत करेल, असा आशावाद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.