Shocking Death While Drawing Water : जळगाव जिल्ह्यातील वांजोळा गावात विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. तिच्या माहेरच्या लोकांनी घातपाताचा आरोप करत मृतदेह भादली येथे अंत्यसंस्कारासाठी नेला. त्यामुळे सासरच्यांनी कणकेच्या पिठाची बाहुली करून प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले.
जळगाव: भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने २५ वर्षीय दीपाली चेतन तायडे या विवाहितेचा मृत्यू झाला. मात्र विवाहितेचा मृत्यू अकस्मात झालेला नसून घातपात असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.