वारकऱ्यांचे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत 

खंडु मोरे
मंगळवार, 20 मार्च 2018

खामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील वारकरी, शेतकरी, कष्टकरी परिवार  मंडळाच्या गल्ली ते दिल्लीपर्यंत शांती संदेश अभियान घेऊन गेलेल्या वारकऱयांचे संसद भवनात आज मंगळवारी (ता. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी स्वागत करत अभियानास शुभ संदेश दिला.

खामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील वारकरी, शेतकरी, कष्टकरी परिवार  मंडळाच्या गल्ली ते दिल्लीपर्यंत शांती संदेश अभियान घेऊन गेलेल्या वारकऱयांचे संसद भवनात आज मंगळवारी (ता. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी स्वागत करत अभियानास शुभ संदेश दिला.

वारकरी, शेतकरी, कष्टकरी परिवार मंडळ यांच्या वतीने खामखेडा ते दिल्ली शांती संदेश यात्रा काढण्यात आली. श्रम, व्यसन हटवा आणि स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदुषण मुक्त भारत घडवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले. व्यसनांपासून सावध राहावे, मोबाईलचा वाढत जाणारा अतिवापर कमी करावा असे विविध प्रकारचे संदेश घेऊन वारकरी मंडळ खामखेडयाच्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत जात असतांना वाटेत लागणाऱ्या छोट्या मोठ्या गावांमधे शहरामध्ये हे संदेश देत थेट दिल्लीत आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेत दिंडीचा उद्देश सांगितला.

नाशिक जिल्ह्यातील एका खेड्यातील तरुण व कष्टकरी शेतकऱ्यांनी केंद्र शासन करत असलेल्या कामांवर वारकऱ्यांनी लोकप्रबोधन करत सुरु केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. व त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्यात.

यात्रा वारकरी संप्रदायाचा संत नामदेव महाराजांचा ध्वज घुमान या कर्मभूमीत घेऊन जात. त्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. तसेच भारतीय सैनिकांचा वाघा बॉर्डर येथे जात विशेष सन्मान करुन या जनजागृती अभियानाचा समारोप करणार आहेत. वाघा बॉर्डर वरील सैनिकाना वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात यावा यासाठी पंतप्रधान कार्यालयातून यावेळी पंतप्रधान यांनी सूचना दिल्यात.

या संदेश अभियानात वारकरी परिषदेचे अध्यक्ष सुभाष काका बिरारी, यादवराव शेवाळे, अण्णा कोठावदे, बाळू बोरसे, राजेंद्र बोरसे, हिरामन बच्छाव,साहेबराव मोरे, मोठाभाऊ नंदाळे, निरंजन बहिरम, महेश शिरोरे आदी वारकऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी वारकरी प्रतिष्ठानचे सुभाष बिरारी व महेश शिरोरे यांच्या हस्ते पंतप्रधानांना विश्वरत्न सन्मान व गौरव पत्र देण्यात आले.यावेळी खा हरिचंद्र चव्हाण व  वारकरी उपस्थित होते.

देवळा सारख्या ग्रामीण भागातुन कष्ठकरी शेतकरी वारकर्यांनी  खामखेडा  ते दिल्ली शांती संदेश यात्रेच्या माध्यमातून सुरु केलेल्या उपक्रमाचे पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले, असे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.  
 

Web Title: warkari welcomed by narendra modi in delhi