मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे मध्यम व लघु प्रकल्पांमधील साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. उन्हाचे वाढते प्रमाण पाहता जूनपर्यंत बहुतांश धरणे तळ गाठण्याची शक्यता आहे. निम्म्या जिल्ह्याची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा केवळ ३५ टक्क्यांवर आला आहे.