येवला- पालखेड डावा कालव्याला भुंगेरे पडल्याने पिंपळगाव बसवंतजवळ भराव खचला होता. त्यामुळे पालखेड कालव्याच्या दुसऱ्या आवर्तनाला दोन दिवस उशीर झाला. अखेर प्रशासनाने ३५० मीटर प्लास्टिक आच्छादन केल्यानंतर निफाड व येवल्यातील शेती सिंचनासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.