जळगाव- जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळिशीकडे जात असताना पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व आवर्तने यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचा उपयुक्त पाणीसाठा ५५ टक्क्यांवर आला आहे. यात गिरणा धरणातील साठा ३९ टक्क्यांवर आहे. गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. सध्या चौथे आवर्तन सुरू आहे. सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पातून १२०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे.