अमळनेर- अमळनेर तालुक्याला एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या तीव्र झळा बसू लागलेल्या दिसून येत आहेत. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. त्यामुळे अनेक गावांतील ग्रामस्थांना आपली तहान भागविण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील डांगर या गावातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करण्याचा प्रस्ताव तालुका प्रशासनाकडून जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला.