तळोदा- तळोद्यात जोमाने शिवसेनेची बांधणी करायची असून, शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ. शिवसेनाप्रमुख यांनी आम्हाला एकच जात शिकविली आणि ती म्हणजे पोटाची जात. गोरगरिबांची पोटं कशी भरतील यासाठीच आम्ही काम करतोय. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणारे आम्ही आहोत. जनतेची कामे अशा जनसंपर्क कार्यालयातून होत असतात. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांचे आशीर्वाद घ्या, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.